प्रियसीला भेटायला गेला आणि जीवच गमावला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- ‘प्यार किया तो डरना क्या’ हे वाक्य तुम्ही जरूर ऐकले असेल… मात्र लग्नानंतर हे प्रेम प्रकरण एका व्यक्तीच्या चांगलेच अंगलट आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत त्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

विवाहित प्रेयसीला भेटायला गेल्यानंतर तिच्या नवऱ्याची अचानक एन्ट्री झाल्याने उडालेल्या गोंधळात अपार्टमेंटच्या बाल्कनीतून उडी घेणाऱ्या तरुणाचा थेट रस्त्यावर पडून मृत्यू झाला.

दरम्यान ही धक्कादायक घटना भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये घडली. त्याच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून भंडारा ठाण्यात तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.

महेश वसंतराव डोंगरवार (३६) रा. शिवाजी वार्ड, साकोली असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी मध्यरात्री महेश भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला.

बेडरूममध्ये हे दोघे असताना प्रेयसाच्या पतीची एन्ट्री झाली. त्याने बेडरुमचे दार वाजविले. तेव्हा महेश हातात कपडे पकडून बाल्कनीत पोहचला व बाल्कनीच्या दाराची कडी बाहेरून लावली.

आतून दार वाजविण्याचा आवाज येत असल्याने तो गडबडीत खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि थेट सिमेंट रस्त्यावर पडला. त्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

प्रेयसीने भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहे. याघटनेने एकच खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe