दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती पत्नीने केले असे काही..

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- पती-पत्नीमधलं नातं सगळ्यात अनोखं असतं. या नात्यामध्ये जेवढं प्रेम असतं तितकेच वादही असतात.संशय हा नात्यामधला सगळ्यात मोठा शत्रू आहे. यामुळे एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

यामध्ये संशयावरून पत्नीने थेट पतीवर चाकू हल्ला केला. पण सत्य काही वेगळंच होतं. मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या एका महिलने तिच्या पतीवर चाकू हल्ला केला. कारण, पती मोबाईलमध्ये एका स्त्रीचा खासगी फोटो पाहत होता.

यामुळे पत्नीला राग अनावर झाला आणि तिने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. पण यानंतर जे सत्य समोर आलं, ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

ते झालं असं की पती ज्या महिलेचा फोटो पाहत होता ती दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची पत्नीच होती. ही धक्कादायक घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अनेक लोक या बातमीला शेअर करत आहेत. मेस्किकोमध्ये झालेल्या या प्रकारामुळे संशय घेणं किती वाईट आहे याचा अंदाज तुम्ही लावूच शकता. महिलेने फोटोकडे नीट न पाहताच पतीवर रागाने हल्ला केला.

सुदैवाने पतीने वेळीच तिला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पत्नीला शांत केल्यानंतर पतीने तिला फोटो दाखवले. तेव्हा ते फोटो पत्नीचेच होते.

इतकंच नाही तर पती जो फोटो पाहत होता तो त्यांच्या लग्नाच्या आधीचा असल्याचं पत्नीने माध्यमांना सांगितलं. तेव्हा आमचं लग्न झालं नसून आम्ही डेट करत होतो.

तेव्हाची ही आठवण असल्याचं तिने स्पष्ट केलं. असे अनेक जुने फोटो पतीने जुन्या ईमेलमध्ये सेव्ह करून ठेवले आहेत. पत्नीची आठवण आली की तो या फोटोंना पाहत असतो. पण हेच फोटो त्याच्यावर एक दिवस संकट ओढावतील याचा त्याने विचारही केला नव्हता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment