हा बडा नेता आता प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये करणार प्रवेश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- शिवसेना मग राष्ट्रवादी असा प्रवास करत सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आता काँग्रेसचा हात धरणार आहेत. २८ जानेवारी ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा हा जंगी पक्ष प्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस बळकट होण्यास मदत होणार आहे. सुरुवातीला काही काळ ते शिवसेनेत होते.

परंतु शिवसेनेत अपेक्षित जबाबदारी न मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार केला होता. शिवसेनेत असणाऱ्या धवलसिंह यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केले होते. पण राष्ट्रवादीत ते दुर्लक्षितच राहिले.

यामुळे आता त्यांनी काँग्रसेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.सोलापुरातील स्ट्राँग आणि तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe