अकोले : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मुळा बारमाहीचे स्वप्न पहिले होते ते आज पूर्ण झाले असून, मुळा नदीमध्ये ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले. अनेक धरणे बांधून शेवटच्या टप्यात पिंपळगावखांड हे धरण बांधून मुळा बारमाही केली. याचा मुळा खोऱ्यासह पठार भागातील गावांना लाभ झाला, असे वैभवराव पिचड यांनी म्हटले आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पिचड बोलत होते. यावेळी डॉ. अशोक इथापे, जि. प. अर्थ बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, जि. प. भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, सेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, चांदशेठ शेख, गणेश आभाळे, सरपंच अर्चना आहेर, चंद्रकांत घुले, ललिता आहेर, जयश्री कान्होरे, बबन गागरे उपस्थित होते. श्री. पिचड पुढे म्हणाले, गेल्या चाळीस वर्षापूर्वीचा पठार आणि आजचा पठार व अकोले तालुका यात आमुलाग्र बदल झाला आहे.

मुळा बारमाही झाल्याने शेतीमध्ये चांगले उत्पन्न घेतले जात आहे. शेतीतून शेतकरी समृद्ध झाला. अनेक विकास कामे केली. ही कामे मात्र विरोधकांना दिसत नाही. गेल्या पाच वर्षात आपण तालुक्यासाठी निधी आणता येऊ शकला नाही. त्यामुळे रस्ते, पाणी याचे प्रश्न मार्गी लावू शकलो नाही. तालुक्यातील विकास कामे मार्गी लागावेत. यासाठीच आपण भाजपात गेलो. सतेत असल्यावर प्रश्न मार्गी लागतात. यासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे.
मी पक्ष बदलला नसता तरी मला आपण निवडूनही दिले असते, पण तुमचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी संघर्षही केला असता, पण मी आपल्याला न्याय देऊ शकलो नसतो. तसेच लोकांचाही आग्रह तेवढाच होता की मी पक्ष बदलावा. म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे पिचड म्हणाले.
- OnePlus 13s बघितला की iPhone विसराल इतकं काही मिळतंय या फोनमध्ये !
- अहिल्यानगर जिल्ह्यात १५ व १६ ते १८ मे रोजी वादळी वारा आणि पाऊस…
- MSRTC News : महाराष्ट्रात येणार एसटीच्या स्मार्ट बसेस ! Pratap Sarnaik यांनी स्पष्टच सांगितलं
- अहिल्यानगरमधील ‘या’ मोठ्या पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखोंची फसवणूक ! संचालक मंडळासह १२ जणांवर गुन्हा
- शिर्डी साईबाबा संस्थानच्या कारभारात मोठा बदल ! कारभारासाठी सरकारकडून नवा फॉर्म्युला तयार