2000 रुपयांची नोट फाटल्यास बँक त्या बदल्यात किती रक्कम देईल? जाणून घ्या नियम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) फाटलेल्या नोटा परत करण्याबाबत नियम ठेवले आहेत. केंद्रीय बँकेच्या या नियमांच्या आधारे बँका फाटलेल्या नोटांच्या बदल्यात ग्राहकांना रिफंड देतात.

फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण बँकेत करता येते. फाटलेल्या नोटांबद्दल लोकांचे अनेकदा अनेकदा प्रश्न असतात, त्यातील एक प्रश्न असा आहे की जर 2 हजार रुपयांची नोट फाटली तर त्या बदल्यात बँक किती परतावा देईल? नियमांनुसार, तुमची नोट किती फाटलेली आहे यावर किती परतावा दिला जाईल हे अवलंबून आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, 2000 रुपयांची नोट 88 वर्ग सेंटीमीटर असल्यास संपूर्ण पैसे मिळतील, तर 44 वर्ग सेंटीमीटर असल्यास निम्मी किंमत मिळेल. याद्वारे, बँक सर्व प्रकारच्या नोटांची देवाणघेवाण करण्यास बांधील नाही.

जर नोट पूर्णपणे नष्ट झाली असेल किंवा जळली असेल, तरीही बँका नोट बदलण्यास नकार देऊ शकतात. नोट नकली नसल्यास ती बदलली जाऊ शकते. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की नोट्च्या देवाणघेवाणीसाठी बँक आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत.

ही सेवा बँकेमार्फत विनामूल्य पुरविली जाते. रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना साफ आदेश दिले आहेत की अशी कोणतीही नोट बदलून देऊन नये जी जाणूनबुजून फाडली गेली असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment