अहमदनगर ब्रेकिंग : गुंड कर्डिलेच्या मुसक्या आवळल्या !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-विरोधात निवडणूक लढविल्याच्या रागातून पराभूूत उमेदवार जयवंत नरवडे या ५५ वर्षीय वृद्धावर तलवार, काठया तसेच पिस्तुलाने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या अमोल कर्डीले या गुन्हेगाराच्या पोलिस निरीक्षक घनश्याम बळप

यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग करून चव्हाणवाडी फाटा ता. शिरूर, जि. पुणे शिवारात मुसक्या आवळल्या.

पारनेर व शिरूर तालुक्यातील खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी या गुन्हयांसह इतर सहा गंभीर गुन्ह्यात सुमारे पाच महिन्यांपासून फरार असलेल्या कुविख्यात गुन्हेगार अमोल कर्डिलेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

विविध गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेला अमोल कर्डिले गेल्या पाच महिन्यांपासून फरार होता तो शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील डाळिंबाच्या बागेत लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानंतर पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक विजय कुमार बोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे,दत्तात्रय चौगुले यांच्या पथकाने डाळिंबाच्या बागेत छापा टाकून कर्डिले याला पकडण्याचा

प्रयत्न केल्यानंतर त्यांनेपळ काढत उसामध्ये लपून बसला होता. पोलिस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून अमोल कर्डिले ला अटक केली आहे.गेल्याच आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून कर्डिले यांने एका उमेदवारावर तलवारीने हल्ला केला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment