कुत्र्याने कागद फाडल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेस कुऱ्हाडीने मारहाण

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा : कुत्र्याने कागद फाडल्याचा जाब विचारल्याचा राग येवून, जाब विचारणाऱ्या महिलेस महिला व पुरूषांनी कुऱ्हाडीने बेदम मारहाण केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे घडली आहे.या मारहाणीत शकुंतला बबन धोत्रे वय ६२ या गंभीर जखमी झाल्या आहेत.याबाबत धोत्रे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, दि.३ऑक्टोबर रोजी सकाळी धोत्रे यांच्या बाजरीच्या कणसावरील प्लास्टिकचा कागद ज्ञानदेव धोत्रे यांच्या कुत्र्याने फाडला होता. शकुंतला धोत्रे यांनी याबाबत संबंधिताकडे विचारणा केली असता. जाब विचारल्याचा राग येऊन सुनील धोत्रे यांनी कुऱ्हाडीने सचिन धोत्रे याने दगडाने, तर संगीता धोत्रे हिने बांबूने फिर्यादिस मारहाण केली.

या मारहाणीत या मारहाणीत धोत्रे या जखमी झालेल्या असल्यामुळे त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू होते दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धोत्रे यांनी दि.९ऑक्टोबर रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन मारहाण करणाऱ्या सुनील ज्ञानदेव धोत्रे, सचिन ज्ञानदेव धोत्रे, संगीता ज्ञानदेव धोत्रे रा.ढोरजा या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment