जिल्हा रुग्णालयात पुढील १५ दिवस दिव्यांगासाठी अपंग मंडळाचे कामकाज सुरू नोंदणी करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांचे आवाहन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथे २७ जानेवारी पासुन पुढील १५ दिवस कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिव्यांगासाठी अपंग मंडळाचे कामकाज सुरु करण्यात येत आहे.

यासाठी रुग्णालयामध्ये दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेतच नोंदणी करणे अपेक्षीत असुन या वेळेत नोंदणी केलेल्या दिव्यांगांचीच अपंग मंडळाकडून तपासणी करण्यात येवून प्रमाणपत्रे वाटप करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी केले आहे.

संबंधीत दिव्यांगाने प्रमाणपत्रासाठी येतांनी त्यांचे स्वतःचे नांव असणारे मुळ रेशनकार्ड, २ पासपोर्ट साईजचे फोटो व आधार कार्डची छायांकित प्रत सोबत आणावी. तसेच दिव्यांग प्रमाणपत्रासाठी येणा-या दिव्यांगांनी रुग्णालयामध्ये सुरक्षीत अंतर ठेवणे, मास्क वापरणे व सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबी बंधनकारक राहतील, असे त्यांनी कळवले आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये हा विषय उपस्थित झाला होता.

त्यावेळी कोरोना कालावधीत नोंदणी बंद ठेवल्याची माहिती डॉ. पोखरणा यांनी दिली होती. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यांदर्भात, आता पुन्हा हे नोंदणी कामकाज सुरू करण्याचे आणि संबंधितांना प्रमाणपत्र वितरीत करायची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News