विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; CBSE च्या 10 वी, 12 वीच्या परीक्षांच्या तारखा या दिवशी जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- केंद्रीय माध्यमिक परीक्षा बोर्ड(CBSE) च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक 2 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी 2021 च्या CBSE परीक्षांबाबत महत्वाची माहिती दिली आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021 (CBSE Board examinations- 2021) ची प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्च रोजी होणार आहे. तर , लेखी परीक्षा 4 मे रोजी सुरु होतील त्या 10 जूनपर्यंत सुरु राहतील.

तर, CBSE परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत लागणे अपेक्षित आहे. शिक्षण मंत्र्यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. CBSE च्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा करताना लवकरच सविस्तर वेळापत्रक लवकर वेबसाईटवर उपलब्ध होईल,

असंही शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक म्हणाले होते. 10 वी आणि 12 वीच्या अंतर्गत मूल्यमापनाला 1 मार्च पासून सुरुवात होणार आहे.