अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :-अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी सध्या देशभरातून निधी संकलन सुरु आहे.
नुकतेच मंदिराच्या उभारण्यासाठी सिंधी बांधवाकडून २११ कि.लो. चांदीच्या विटा रामजन्म भूमी न्यासचे प्रमुख सदस्य चंपत राय यांच्याकडे आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोपविण्यात आल्याची माहिती नगरसेवक मनोज लासी यांनीं दिली.
उल्हासनगरमध्ये सिंधी समाजाची संख्या मोठी असून देशभरातील सिंधी बांधव यांची उल्हासनगरावर श्रद्धा व विश्वास आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर उभारण्यात सिंधी समाजाचे योगदान देण्यासाठी देशातील सिंधी बांधवानी आमदार कुमार आयलानी,
माजी आमदार गुरुमुखदास जगवानी यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या निधीतून २११ चांदीच्या विटा अयोध्या जन्मभूमी न्यासचे संस्थापक सदस्य चंपक राय यांच्याकडे दोन दिवसापूर्वी सुपूर्द केल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी,
भाजपा नगरसेवक राजेश वधारीया, मनोज लासी, महेश सुखरामानी, नरेश दुर्गानी, देवीदास भारवानी, विक्की लासी आदी उपस्थित होते. यावेळी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अयोध्याचे रामलल्ला मंदिर व राम मंदिर बनविणाऱ्या कार्यशाळा, हनुमानगडी, सरयू नदी आदींचे दर्शन घेतले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved