अज्ञात व्यक्तीने उसाला आग लावली, दहा गुंठे ऊस जळाला पण दोन एकर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात अज्ञात व्यक्तीने उसाला आग लावली; मात्र उसाने पेट घेताच काही क्षणात देवेंद्र शिंदे यांनी ऊस शेतीचे मालक व सरपंच संजय गुरसळ यांना याबाबत कल्पना दिली.

भ्रमणध्वनीवरून माहिती देऊन काही तरुण गोळा करत त्यांनी आग विझविल्याने केवळ १० गुंठे ऊस जळाला. तरुणांमुळे दोन एकर ऊस वाचला. पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रोडच्या बाजूला गरुड वस्तीलगत निरुबाई हरिभाऊ माकोणे यांनी अडीच एकर क्षेत्रावर उसाची लागवड केली आहे. ऊस गळितास आलेला असताना अज्ञात व्यक्तीने रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास उसाला आग लावली.

उसाने पेट घेताच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकाने साई आधार दुध डेअरीचे देवेंद्र शिंदे यांना ही माहिती दिली. दूध संकलन सुरू असताना बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेताला आग लागून नुकसान होणार ही बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सरपंच संजय गुरसळ यांना याबाबत कल्पना दिली. सरपंचांनी काही तरुणांना फोन लावत घटनास्थळी बोलावून घेतले.

जवळपास दहा गुंठे ऊस जळून खाक झाला होता आणि बाजूचाही दोन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार होता; मात्र सरपंच संजय गुरसळ, देवेंद्र शिंदे, मनोज माकोणे, बाबासाहेब पवार, संतोष पवार, नवनाथ गुरसळ, दिगंबर पवार या तरुणांनी कशाचीच पर्वा न करता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.आग विझविल्याने केवळ १० गुंठे ऊस जळाला. तरुणांमुळे दोन एकर ऊस वाचला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment