मनसेची अनोखी गांधीगिरी; धोकादायक डीपीला घातला हार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-वीज खांबावरील उघड्या रोहित्रास हार घालून मनसेच्या वतीने अनोखे असे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. दरम्यान हे आंदोलन सिव्हील हडको परिसरातील भगत मळा याठिकाणी करण्यात आले होते..

दरम्यान शहरातील सिव्हील हडको परिसर असून म्हाडाच्या रहिवासी वसाहती आहेत. या ठिकाणी अनेक लहान मुले खेळत असतात. या ठिकाणी असणारे खांबावरील रोहित्र उघडे असून विजेवरील अनेक तारा देखील तुटलेल्या आहेत,

त्यामुळे मोठा अनर्थ होऊ शकते. सावेडी उपनगर कार्यालयातील अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित अधिकार्‍यांचा फोन बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

त्यामुळे त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन येथील रहिवाशांचे सोबत घेऊन वीज वितरणच्या गलथान कारभाराविरोधात सदरील खांबाला हार घालून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment