अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-नुकत्याच जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण पडले आहे.
मात्र या प्रर्वगाचा येथे उमेदवारच निवडून आला नाही. परिणामी सरपंच पद रिक्त राहील यामुळे गावाच्या विकासावर वपिरीत परिणाम होवू नये यासाठी येथील सरपंचपदाचे आरक्षण बदलण्यात यावे,
अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. धनगरवाडी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गावचे सरपंच पद रिक्त राहत असल्याने आरक्षण बदलण्याची करण्यात आली आहे.
धनगरवाडी ग्रामपंचायतची निवडणूक नुकतीच पार पडली. सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती स्त्री आरक्षण पडले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत या प्रवर्गातील एकही जागा नसल्याने सरपंच पदाचे आरक्षण पडलेला उमेदवार विजयी झालेला नाही.
तसेच अनुसूचित जमाती मध्ये गेल्या दहा वर्षांपासून येथील सदस्य पदाची ही जागा रिक्तच आहे. सरपंच पद रिक्त राहिल्यास गावच्या विकासात अडचणी निर्माण होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अनुसूचित जमाती स्त्री उमेदवारच नसल्याने येथील आरक्षणात बदल करून सरपंच पद रिक्त राहणार नाही. यासाठी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved