ब्रेकिंग न्यूज ! अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे 30 जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते.

दरम्यान, आज अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चाैधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली व ही भेट यशस्वी ठरली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत 15 मुद्दे त्यांनी केंद्र सरकारपुढे ठेवले असून, त्यासाठी एक समिती स्थापन होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेचशे प्रश्न सुटतील, त्यावर माझा विश्वास आहे, असे अण्णा म्हणाले. अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी,

या व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची राळेगणसिध्दीत भेट घेतली.

भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, कोरोनामुळे अण्णांनी सुचिवलेल्या प्रश्नांना उशीर झाला. आता अण्णांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रात उच्चस्तरीय कमिटी स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक आयोिजत करणार असून यावेळी अण्णा हजारे हेही उपस्थित राहतील.

समितीतील सदस्यही अण्णाच सुचवतील. कृषी राज्यमंत्री चौधरी म्हणाले, शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत अण्णांच्या प्रत्राची केंद्राने वेळवेळी दखल घेतली आहे. त्यात अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी जे प्रश्न आहेत, ते कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील. दरम्यान हजारे म्हणाले कि,

आपल्या 15 मुद्दे असलेल्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यासाठी लवकरच समिती स्थापन होऊन शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय होणार आहे. केंद्र सरकार याबाबत चांगला निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे उद्याचे आंदोलन स्थगित करीत असल्याचे हजारे यांनी जाहीर केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News