बनावट मेलद्वारे व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- बनावट मेलद्वारे खोटी कागदपत्रे तयार करून केडगाव येथील व्यावसायीकाची तब्बल १४ लाख १७ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

ओंकार मधुकर भालेकर (रा. केडगाव) यांनी सायबर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही घटना १३ जुलै २०२० ते २८ जानेवारी २०२१ च्या दरम्यान घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपींनी फिर्यादीशी खोटी ओळख सांगून मैत्री केली. भारतातील हर्बल प्रॉडक्ट कंपनीकडून आयुर्वेदीक कच्चा माल हर्बल ऑईल खरेदी करण्याचा बहाणा केला.

त्यासाठी बनावट मेलद्वारे खोटी कागदपत्रे पाठवून १४ लाख १७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोसई. कोळी हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News