तिघाजणांकडून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी एकास कट मारून लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा येथे घडली.

याघटनेत तेजस उत्तम वंजिरे हा जखमी झाला असून याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मोटारसायकलवरून आलेल्या उमेश शिवाजी वेताळ, सुशांत उर्फ सोन्या शामराव गुंजाळ,

कमलेश उर्फ कमलाकर शामराव गुंजाळ सर्व रा.जोशी वस्ती यांनी मोटारसायकलवरून येत फिर्यादीच्या भावास कट मारला व नंतर फिर्यादी स्वत: मुंढेकर यांच्या इस्त्रीच्या दुकानासमोरून जोशी वस्तीकडे जात असताना

वरील तिघांनी फिर्यादी तेजस उत्तम वंजिरे यास अडवून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडके व तलवारीने वार करून जखमी केले.

याप्रकरणी वंजिरे यांच्या फिर्यादीवरून वरील तिघांविरूध्द श्रीगोंदा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास जाधव हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe