वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. पुन्हा एकदा कारखाना सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर विश्वास टाकला आहे.

या निवडणुकीमध्ये अनेक नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये साहेबराव गोपीनाथ सातपुते, यशवंतराव गवळी, बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे, काकासाहेब शिंदे, कुशीनाथ बर्डे यांचा समावेश आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे- कासार पिंपळगाव गट- आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धवराव रघुनाथ वाघ, चितळी गट- अनिल शिवाजी फलके, साहेबराव गोपीनाथ सातपुते, सुभाष बाबुराव ताठे. कोरडगाव गट- श्रीकांत साहेबराव मिसाळ, बाबासाहेब रंगनाथ किलबिले. पाथर्डी गट- रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत.

मिरी गट- शरद हरिभाऊ अकोलकर, यशवंतराव निवृत्ती गवळी. टाकळीमानूर गट- बाळासाहेब भगवान गोल्हार, शेषराव सूर्यभान ढाकणे. इतर मागासवर्ग – कुशीनाथ खंडू बर्डे. भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी- कोंडीराम रामजी नरोटे. असे बिनविरोध संचालक निवडून आले आहेत.

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था सभासद मतदारसंघ- राहुल आप्पासाहेब राजळे. अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी- काकासाहेब मुरलीधर शिंदे. महिला प्रतिनिधी- सिंधुबाई महादेव जायभाये, मोनिका राजीव राजळे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment