पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन – प्रताप ढाकणे

Ahmednagarlive24
Published:

पाथर्डी :- तुम्ही सर्वांना संधी दिली, एक वेळ मला संधी द्या. पाथर्डी-शेवगावच्या पूर्व भागात पाणी आणण्यासाठी मी आमदारकी पणाला लावेन. कारण ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता खाली ठेवायचा असेल, तर पाण्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी आल्याशिवाय कोयता जाणार नाही, असे पाथर्डी-शेवगावमधील राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. प्रताप ढाकणे यांनी खरवंडी कासार येथे बोलताना सांगितले.

भाऊ बाबा मंगल कार्यालयात भालगाव जि. प. गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा बैठकीत ढाकणे बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक किरण शेटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी पालवे, गहिनाथ शिरसाठ, गहिनाथ कातखडे, ऋषिकेश ढाकणे, दिलीप पवळे, राजेंद्र हिंगे, बाळासाहेब बटुळे, अनिल जाधव, राजेंद्र जगताप उपस्थित होते.

बैठकीपूर्वी ढाकणे यांनी बाजारपेठेत फेरी मारत ग्रामस्थ व व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. ढाकणे म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून मागील निवडणुकीत राजळेंना लोकांनी संधी दिली. अकराशे कोटींचा निधी आणला म्हणत त्यांनी ट्रकभर नारळ फोडले. मतदारसंघात दोनशे गावे आहेत.

अकराशे कोटी म्हटले, तर एका गावाला दोन-तीन कोटी आले असते. यातून त्यांचा खोटेपणा व मानसिकता समजते. मी बोलणार नाही, करून दाखवेन. मनाचा मोठेपणा दाखवत शेवगाव तालुक्यात घुलेंनी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.

काकडे, लांडे, पालवे सर्वच माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत. कुठेही जाती-पातीचा विषय नाही. मात्र, आता विरोधकांकडे विषय शिल्लक नसल्याने दूषित राजकारण करण्यात येत आहे. गेल्या २५ वर्षांपासून काम करत असल्याने सर्वांचे प्रश्न मला माहीत आहेत. माझ्याकडे तळमळ करण्याशिवाय पर्याय नव्हता, आता संधी आली आहे, असे ढाकणे म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment