संगमनेर :- तालुक्याच्या पठार भागावरील हनुमानवाडी, सारोळे पठार येथे एका २९ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना मंगळवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी घडली.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ही विवाहित महिला आपल्या कुटुंबासोबत हनुमानवाडी, सारोळे पठार याठिकाणी राहते. गावातीलच हसन बनेमियाँ मोमीन याने मंगळवारी सकाळी घरी येऊन या महिलेचा हात धरुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर ‘तू आरडाओरडा केल्यास तुझ्याकडे पाहून घेईल’ अशी धमकी मोमीन याने दिली. त्यानंतर महिलेची ननंद घराजवळ आली असता मोमीन तेथून निघून गेला.याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी मोमीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.