कर्जत : ‘मी राज्याचा भूमिपुत्र असून, कर्जत-जामखेडसोबत माझे मागील जन्माचे काही तरी नाते असावे. म्हणूनच मी येथून विधानसभेची निवडणूक लढवित आहे. जनतेच्या आशिर्वाद आणि प्रेमामुळे हमखास विजय मिळवणार असा विश्वास मला आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केले.
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पवार यांनी कर्जत शहरातून भव्य रॅली काढली. त्यात युवकांची मोठी संख्या होती. रॅली संपल्यावर रणरणत्या उन्हातही प्रचारसभा घेण्यात आली. या वेळी बाळूमामा यांचे वंशज उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘कर्जत व जामखेड मतदारसंघातील सर्व जनतेच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथील जनतेला त्यांच्या हक्काचा, त्याच्यांसोबत राहून सर्व प्रश्न आणि समस्या समजून घेऊन शेवटच्या घटकापर्यंत जाणारा लोकप्रतिनिधी हवा आहे.
मी या राज्याचा भूमिपुत्र आहे. या मतदारसंघाशी माझे पुर्वजन्मीचे काहीतरी घट्ट नाते असावे. यामुळेच मी येथे उभा आहे. १० वर्षांत राम शिंदे यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. ठरावीक मंडळींना हाताशी धरून राजकारण करणे एवढेच त्यांनी केले.
आता असे काय घडले की, गायब झालेले मंत्री तीन महिन्यांपासून मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत?’ ‘देशातील भाजप सरकार प्रत्येक राजकीय नेत्याला ईडीचे हत्यार काढून घाबरवून सोडत होते. तसा प्रयत्न त्यांनी शरद पवार यांच्याबाबतही केला.
मात्र, पवार साहेबांनी ईडीला शिंगावर घेतले. ईडी घाबरून पुढे पळत होती आणि शरद पवार मागे पळत होते. हे चित्र संपूर्ण देशाने पाहिले आहे.
- Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले
- Tata Sierra 2025 : टाटा मोटर्सची धमाल ! Tata Sierra EV सादर, किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट जाणून घ्या
- लग्न जुळेना, बाहेर जाण्यास बंदी, पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत ! टक्कल पडलेल्या लोकांचे काय हाल होत आहेत ?
- Tata Power Share : टाटा पॉवर शेअरची झेप; ब्रोकिंग फर्मने दिली चकित करणारी टार्गेट प्राईस
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे मेट्रोच्या वेळेत झाला मोठा बदल