तीन लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत ‘ टाटा टियागो’ खरेदी करण्याची संधी; त्वरा करा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-शनिवारी टाटा मोटर्सने आपल्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक टियागोची लिमिटेड एडिशन ट्रिम सादर केली. दिल्ली शोरूममध्ये याची किंमत 5.79 लाख रुपये आहे.

आपल्याकडे जर इतके बजेट नसेल तरी आपण स्वस्त टाटा टियागो कार खरेदी करू शकता. या कारची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

वास्तविक, Tata Tiago Revotron XZ 2016 ही कार ड्रूम या सेकंड हँड कार विक्रीच्या प्लॅटफॉर्म 2 लाख 90 हजार रुपयांना विकली जात आहे.

फर्स्ट ओनर ही कार विक्री करीत आहे. ही 5 सीटर कार आतापर्यंत सुमारे 70 हजार किलोमीटर धावली आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर ते 1199 सीसी आणि मॅक्स पावर 84 आहे.

ही कार खरेदी करण्यासाठी आपल्याला ड्रूम च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे कार मॉडेलचा शोध घ्यावा लागेल. त्याच्या पुढील पेजवर आपल्याला ड्रूमला टोकन रक्कम द्यावी लागेल.

ही टोकन रक्कम रिफंडेबल असेल. याचा अर्थ असा आहे की जर काही कारणास्तव करार पूर्ण झाला नाही तर आपणास टोकन रक्कम परत मिळेल.

सादर झाली Limited Edition Trim :- टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की या मॉडेलची सुधारित आवृत्ती वर्षापूर्वी सादर करण्यात आली होती.

नवीन व्हर्जनमध्ये ब्लॅक अलॉय व्हील्स, सेन्सर्ससह रिव्हर्स पार्किंग डिस्प्ले, व्हॉईस कमांड्स इत्यादी नवीन फीचर्स समाविष्ट केली गेली आहेत.

टाटा मोटर्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “टियागोला 2016 मध्ये सादर केले गेले होते. हे त्याच्या कॅटेगिरीमधील एक यशस्वी मॉडेल आहे आणि सर्वांनी कौतुक केले आहे.

या मॉडेलची बीएस 6 एडिशन 2020 मध्ये सादर केली गेली. त्याला चार-स्टार सुरक्षा रेटिंगही मिळाली आहे. “ते म्हणाले की, सध्या रस्त्यावर 3.25 लाख टियागो आहेत. बाजारात या मॉडेलला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment