चोरट्याने कारमधून मोबाईल लंपास केला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- कारच्या उघड्या असलेल्या काचतून हात आत टाकत कारमधून १३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी दुपारी दोन ते सव्वा दोन वाजेच्या दरम्यान गांधी मैदान येथे घडली.

कोतवाली पोलीस ठाण्यात आयुबखान रमजानभाई शेख (वय ५३ रा. शिरूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

फिर्यादी आयुबखान रमजानभाई शेखयांनी गांधी मैदानावर शनिवारी दुपारी दोन वाजता त्यांची कार (क्र. एमएच १२ एलपी २९९९) पार्क केली होती.

कारच्या चालक बाजूची काच थोडी उघडी होती. उघड्या काचमधून हात घालून अज्ञात चोरट्याने कारमधील मोबाईल चोरून नेला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दुधाळ करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!