अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- ओढ्यातून वाळू उपसा करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर नगर तालुका पोलिसांनी कारवाई केली. हा प्रकार नगर तालुक्यातील वाळकी येथे घडला होता.

दरम्यान या कारवाईत एक ब्रास वाळू व विना नंबरचा ट्रॅक्टर, ट्राली असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई जाधव यांनी फिर्याद यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक पंडीत तुकाराम जुंदरे (वय २६) व मालक दिनेश सखाराम कासार (वय २५ दोघे रा. वाळकी ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळकीच्या ओढ्यातून चोरून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती.

या मिळालेल्या माहितीनुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बी.बी. धुमाळ, पोलीस शिपाई जाधव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस नाईक कदम करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News