पाच वर्षात त्यांनी फक्त विकासाच्या थापा मारल्या – उपनेते अनिल राठोड

Ahmednagarlive24
Published:

नगर : नगरची जनता हुशार आणि सुज्ञ आहे. त्यांना कुणी कितीही विकासाच्या थापा मारून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्याचे उत्तर जसे लोकसभेच्या निवडणूकीत दिले तसेच उत्तर हया विधानसभेच्या निवडणूकीत देतील. 

या लोकप्रतिनिधींनी आपल्या घराच्या जवळ असणारे सारसनगर भागातील नागरीकांना पिण्याचे पाणी देऊ शकले नाही आणि टँकर मुक्तही करू शकले नाही, त्यांनी विकासाच्या खोटया वल्गना करू नये. उड्डानपुलाचे अनेक भूमीपुजन झाले पण जनतेला आत्तापर्यत उड्डानपुल पाहायलाच मिळाला नाही. यांना जनतेचे आणि शहरातील प्रश्‍नच मार्गी लावता येत नाही ते फक्त दुस-याला बदनाम करण्याचे काम करतात. पाच वर्षात नगरच्या बडबोले लोक प्रतिनिधींनी नागरीकांना विकासाच्या थापा मारल्या, काम केले तर कोणते शिवसेनेला बदनाम करण्याचे. असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. 

महायुतीचे नगर विधानसभेचे उमेदवार अनिल राठोड यांनी निर्मलनगर परिसरातून नागरिकांशी संवाद साधुन त्यांचे जनआशिर्वाद घेण्यासाठी प्रचारफेरी काध्ली. यावेळी विशाल नाकाडे, विजय सानप, पांडुरंग दातीर, गिरीश जाधव, डॉ.चंद्रकांत बारस्कर, वैभव सुरवसे, अनिकेत कराळे, गोकुळ काळे, गणेश बांगर, प्रशांत नरवडे, अक्षय कातोरे सह महायुतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.   

राठोड पुढे म्हणाले, शिवसेनेने कधीच छोटयाशा पोटनिवडणूकीसाठी दहशत करत हत्याकांड केले नाही, गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेने नागरिकांचा विश्‍वास जिंकुन कायम हया नगर शहरात, महापालिकेत जास्त प्रमाणात नगरसेवक पाठविण्याचे काम केले आहे. जनमताने शिवसेना प्रत्येक वेळेस निवडणूकीत विजयी होते, त्याचे कारण कधीच गलिच्छ राजकारण केले नाही. प्रत्येकाला पदावर विराजमान करण्याचा मान नगर शहरातील विविध समाजातील लोकांना कुणी दिला असल तर तो फक्त शिवसेनेने असे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment