पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक नव्या घोषणा केल्या.

यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधीभार लावला आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच कारणामुळे राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे, अशी टीका राऊत यांनी केलीये.

तसेच आगामी काळात काही राज्यांत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने आर्थिक तरतूद केली असेल, तर हा अर्थसंकल्प देशाचा नसून तो एका पक्षाचा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, असा घणाघात राऊत यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!