श्रीगोंदे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मोठा राजकीय भूकंप झाला. राजेंद्र नागवडे भाजपवासी झाल्यानंतर त्याचा परिणाम शहराच्या राजकारणात झाला. काँग्रेस आघाडीच्या सात नगरसेवकांनी व नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला.
बबनराव पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी सर्व नगरसेवकांचे बबनराव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, सदाशिव पाचपुते यांनी स्वागत केले. सदाशिव पाचपुते म्हणाले, मागे काय झाले हे न पाहता शहरासाठी विकासात्मक दृष्टिकोन सर्वांनी ठेवावा.

श्रीगोंदे नगरपालिका राज्यात आदर्श नगरपालिका करण्यासाठी सर्वांनी काम करावे. माजी नगराध्यक्ष व काँग्रेस आघाडी चे गटनेते नोहर पोटे म्हणाले, मध्यंतरी काही कारणामुळे बबनराव पाचपुते यांना सोडून जावे लागले.
मला मतदानाचा अधिकार आल्यापासून आजतागायत मी बबनराव पाचपुते यांचेच काम केले. मी त्यांचा कार्यकर्ता असून बबनदादांवर आपले पहिल्यापासूनच प्रेम आहे. शहराचा विकास डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय आपण घेतला.
बबन दादांना सोडून जाण्याची मनापासून इच्छा नव्हती. मागील पाच वर्षांत पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास झाला. यावेळी बापूसाहेब गोरे, उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक, पोपटराव खेतमाळीस, दत्तात्रेय हिरणावळे, दीपक शिंदे यांसह भाजप नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- जे सातव्या वेतन आयोगात घडलं नाही ते 8व्या वेतन आयोगात घडणार ! महागाई भत्ता (DA) मध्ये सगळ्यात मोठा बदल होणार, वाचा…
- Home Loan घेताय का ? मग बँक ऑफ बडोदाकडून 40 लाखाचे होम लोन घेतल्यास किती ईएमआय भरावा लागणार ? वाचा…
- कर्जत नगराध्यक्ष निवडणुकीत राम शिंदे आणि आमदार रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला, दोन्हीकडून अर्ज दाखल
- लाडक्या बहिणींची मोठी निराशा ! एप्रिलचा हफ्ता लांबणार, अक्षय तृतीयाचा मुहूर्त हुकणार, आता ‘या’ तारखेला खात्यात जमा होणार पैसे
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! आता पुणे रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी दररोज धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन