अहमदनगर :- शिवसेनेचे उपनेते माजी आ.अनिल राठोड यांना मातोश्रीवरून गुलाल घेवून या अन मंत्रीपद घेवून जा असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे,
त्यामुळे नगर शहरातील जनतेने अनिल राठोड यांनाच विजयी कराव आणि शहर विकासासाठी अनिल राठोड यांना मंत्रीपदाची संधी मिळवण्यास सहकार्य करावं असे आवाहन प्रथम महापौर भगवान फ़ूलसौंदर यांनी केले.

नगर शहरात वैद्यकीय महाविद्यालय,अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर असून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ते होऊ दिले नाही. त्यामुळे नगर शहरातील तरुणांना शिक्षणासाठी पुण्याला जावे लागते, तसेच३० वर्षांत सारसनगरला दोंन लोकप्रतिनिधी असूनही या भागात पाणी,कचरा, लाईट हे प्राथमिक विकासाचे प्रश्न प्रलंबित असल्याची टीका ही त्यांनी यावेळी बोलताना केली.
भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भाजपा कार्यालय येथून प्रचारफेरी काढण्यात आली होती. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.अभय आगरकर, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा विद्ये,
माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, अर्जुन दातरंगे, सुनिल त्रिपाठी, एल.जी.गायकवाड, गौतम दीक्षित, सचिन पारखी, मिलिंद गंधे, बंडोपंत क्षीरसागर, प्रदीप परदेशी, राजेंद्र घोरपडे, बंट्टी ढापसे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भगवान फुलसौंदर यांनी विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी आणि नगरच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचारफेरीस परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- वादळी पावसाचा मुक्काम वाढला! आता ‘या’ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा नवा अंदाज चिंता वाढवणारा
- मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय ! आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध अधिकार असतो का ? न्यायालय सांगते….
- काय सांगता ! ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा जिल्हा, दिल्लीपेक्षा 31पट अधिक क्षेत्रफळ
- लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! E-Kyc पुन्हा झाली सुरु, ‘ही’ आहे केवायसीसाठीची अंतिम मुदत
- महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार ?













