सासरच्या छळास कंटाळून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- माहेरुन दोन लाख रुपये आणत नसल्याच्या रागातून होत असलेल्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती व सासऱ्यास अटक केली, तर सासू फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, नवा वांबोरी रस्ता परिसरात राहत असलेल्या राणी शंकर भुसारी (वय २०) हिने घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केली.

बाबासाहेब कुंडलिक कोल्हे (रा. यशवंतनगर) यांनी फिर्याद दिल्यानंतर पती शंकर बाबासाहेब भुसारी, सासरे बाबासाहेब कुंडलिक भुसारी व सासू रुख्मिणी बाबासाहेब भुसारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरी पक्की करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे याकरीता मयत राणीस दमदाटी, मारहाण, शिवीगाळ करत उपाशी ठेवत होते. ती सप्टेंबर २०२० पासून हा त्रास सहन करत होती.

या छळाला कंटाळून अखेर तीने आत्महत्या केली. सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सोमनाथ झांबरे पथकाने पती व सासऱ्यास अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment