पुणे: औंध येथे दोन गटांत शुक्रवारी रात्री तुफान हाणामारी झाली. यामध्ये एका रिक्षा चालकाचा कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून खून करण्यात आला. तर इतर तीन ते चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांती परस्पर विरोधी तक्रार दाखल केल्या आहेत. त्यानूसार खुन आणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाले आहेत.

रफीक लाला शेख (27,रा.चंदन सोसायटी, नागरस रोड, औंध) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी रफीकच्या भावाने फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीनूसार जुन्या भांडणाच्या कारणावरुन हर्ष इमारतीच्या जवळील मांडवाच्या बाजूला आरोपी इम्रान यूसूफ शेख, शुभम भिसे, उमेश धर्मेंद्र, इरफान यूसूफ शेख, यूसूफ हुसेन शेख (सर्व,रा,औंध) यांनी तलवार, लोखंडी कोयता, लोखंडी रॉड याने फिर्यादीचा भाऊ रफिक याच्यावर हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले.
रफीकला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, त्याला मृत घोषीत करण्यात आले. तर युसूफ हुसेन शेख (५०,रा.औंध) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार फिर्यादी व त्यांचा मुलगा इरफान, इम्रान आणी त्याचे मित्र शुभम व उमेश हे इमारतीच्या जवळ उभे असताना आरोपी रफीक लाला शेख, शफीक लाला शेख आणी नावेद लाला शेख हे दुचाकीवरुन तेथे दाखल झाले. त्यांनी फिर्यादीची मुले आणी त्यांच्या मित्रांवर लोखंडी कोयते आणी रॉडने प्राणघातक हल्ला केला.
- Stock To Buy: लॉजिस्टिक क्षेत्रातील ‘हा’ शेअर्स मिळवून देऊ शकतो पैसा! नोट करा ब्रोकरेजने दिलेली रेटिंग आणि टार्गेट प्राईस
- Bonus Shares: ‘या’ 2 कंपन्या या आठवड्यात देणार बोनस शेअर्स! पटकन नोट करा रेकॉर्ड डेट
- Stock Split: अदानी ग्रुपची ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी देणार गिफ्ट! 5 वर्षात दिलेत 1505% रिटर्न…बघा अपडेट
- Share Market: ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांची केली माती! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर नाहीत ना? बघा यादी
- Smallcap Stocks: लॉन्ग टर्म गुंतवणुकीची मोठी संधी! ‘हे’ स्मॉल कॅप्स शेअर्स देतील 40% पर्यंत रिटर्न? बघा लिस्ट