‘ह्या’ शेअरची कमाल ! 1490 रुपयांचा शेअर एका मिनिटात झाला 2607 रुपये

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- इंडिगो पेंट्सचा शेअर आज जवळपास 75% प्रीमियमसह स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाला आहे.

कंपनीने आपले शेअर गुंतवणूकदारांना 1490 रुपयांना दिले होते, जे आज बीएसईमध्ये 1117.50 रुपयांच्या वाढीसह 2607 रुपयांवर लिस्ट झले आहेत. इंडिगो पेंट्सचा आयपीओ 117 पट ओवर सब्सक्राइब झाला. आहे.

20 जानेवारी रोजी गुंतवणूकीसाठी खुले होते :- इंडिगो पेंट्सचा आयपीओ 20 जानेवारी रोजी गुंतवणूकीसाठी उघडला. या आयपीओमध्ये 22 जानेवारी 2021 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 16 पट होता. या आयपीओमध्ये क्‍वालिफाइड इंस्‍टीटयूशन बॉयर्सचा हिस्‍सा 190 पट ओवर सब्सक्राइब झाला.

त्याच वेळी, नॉन इंस्‍टीटयूशन गुंतवणूकदारांचा आयपीओमध्ये सहभाग 263 पट सब्सक्राइब झाला. या आयपीओ मधील कर्मचार्‍यांसाठी राखीव असलेला हिस्सादेखील 2.3 पट सब्सक्राइब झाला होता.

ही प्राइस बँड होती :- इंडिगो पेंट्सने आयपीओसाठी प्राइस बँड 1480 ते 1490 रुपयांच्या मध्ये निश्चित केली होती. नंतर कंपनीने गुंतवणूकदारांना हा शेअर 1490 रुपयांवर ऐलाट केला. इंडिगो पेंट्सच्या आयपीओमध्ये लॉट साइज 10 शेअर्स होते.

जाणून घ्या कंपनीबद्दल :- इंडिगो पेंट्स देशातील टॉप पेंट कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी आपले पेंट्स हे इंडिगोच्या नावाने विकते. कंपनीची ब्रँड इक्विटी बरीच मजबूत आहे. कंपनीचे वितरण नेटवर्क 27 राज्यांत पसरलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment