अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-नाशिकहून पुणे येथे संत्री घेऊन जाणारा ट्रकचा अपघात झाल्याची घटना आज घडली आहे. दरम्यान हि अपघाताची घटना नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आळेखिंड येथे घडली.
संत्री घेऊन जाणारा ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक उलटला. या ट्रकमध्ये १६ टन संत्री पुणे येथे नेण्यात येत होती. या अपघातात ट्रक तसेच मालाचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नाशिक येथून १६ टन संत्री घेऊन जाणारा ट्रक क्रमांक आर.जे. २७ जी.सी. १६६४ पुणे येथे जात असताना सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास
बोटा शिवारातील आळेखिंड येथील हनुमाननगर याठिकाणी आला असता या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक मागे येऊन महामार्गाच्या कडेला एका शेतात जाऊन पलटी झाला.
सुदैवाने या अपघातात एकही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस व महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले व क्रेन पाचारण करण्यात आले. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved