अनेक संस्था तनपुरेंमुळे बंद पडल्या: खा. सुजय विखे

Ahmednagarlive24
Published:

करंजी : राहुरी तालुक्यातील नावारुपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंमुळे बंद पडल्या,ते काय मतदारसंघाचा विकास करणार? असा सवाल करून राहुरी मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार शिवाज़ीराव कर्डिलेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

आ. शिवाज़ीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे आयोज़ित सभेत खा. विखे बोलत होते.

अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशीनाथ पाटील लवांडे होते. विधानसभेच्या निवडणुकीपासनू दूर राहिलेले माजी जि. प. सदस्य मोहनराव पालवे, संभाजीराव वाघ, महादेव कुटे पाटील, पृथ्वीराज आठरे पाटील, राजेंद्र तागड, तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे पाटील, या सर्वांना खा. विखे पाटील यांनी आपल्या गाडीत बसून थेट व्यासपीठावर आणताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून नेते मंडळींचे स्वागत केले.

विखे समर्थक असलेले सर्वच प्रमुख कार्यकर्ते आ. कर्डिलेंच्या प्रचारात सक्रिय झाल्याने आ. कर्डिले यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खा. विखे पुढे म्हणाले, गेल्या दहा वषांर्पासून आ. कर्डिले यांनी मतदारसंघात भरीव विकासकामे केली असून. पुन्हा विकास कामे होण्यासाठी त्यांनाच संधी द्यावी.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना घरी बसण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर टाकली असून, भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा मी सारथी असून, जिल्ह्यात १२ झिरो केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यवर वर्षाला सहा हजार रुपये टाकण्याचे जाहीर केल्याने पाच वषांर्त ७५ हजार कोटी रुपये देशातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. एखाखा देखणा माणूस प्रचारसभेसाठी आल्यास त्याला पाहण्यासाठी गर्दी होणारच, असे म्हणत खा. अमोल कोल्हेंवरही विखेंनी निषाणा साधला.

विकासावर बोलण्यासारखे काहीच नसल्यामुळे विरोधक भावनिक मुद्दे पुढे करत आहेत. ज़्यांना राहुरीत विकास करता आला नाह, ते मतदारसंघाचा काय विकास करणार? वांबोरी चारीचे पाणी टेलच्या गावापर्यंत पोहचवण्याचा शब्द पूर्ण केला. विकासकामांत आम्ही कमी पडणार नाही, असे सांगून खा. विखे म्हणाले, सिंचन घोटाळा व बँक घोटाळा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल.

या वेळी सरपंच काशीनाथ लवांडे म्हणाले, राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहन निवडणुकीत आ. कर्डिले यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे जाहीर केले.

या वेळी माजी जि. प. सदस्य मोहनराव पालवे, ज्येष्ठनेते संभाजी वाघ, महादेव पाटील कुटे, राजेंद्र तागड, पृथ्वीराज आठरे यांनी खा. विखे यांचा आदेश मानून आ. कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले. या वेळी वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे ,माजी सभापती मिर्झा मणियार, शिवसेनानेते रफिक शेख,

जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, पं. स. सदस्य सुनील परदेशी ,एकनाथ आटकर, माजी सरपंच सुनील साखरे, भाऊसाहेब लोखंडे, कारभारी गवळी, विक्रमराव ससाणे, कुशल भापसे,गहिनीनाथ खाडे, अरुण पुंड ,उपसरपंच फिरोजभाई पठाण, सिराज पठाण, सरपंच अनिल गीते, अनिल पालवे , शिवसेना शहराध्यक्ष शरद शेंदुरकर आदींनी भाजप प्रवेश केला. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment