कृषी विद्यापीठाचा कर्मचारी मृतावस्थेत,भावाने केले हे धक्कादायक आरोप !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- राहुरी कृषी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी कामावर मृतावस्थेत आढळल्याने कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. चंद्रकांत देवराम पवार (वय ३८, राहणार खडांबे) हे राहुरी कृषी विद्यापीठात कंत्राटी पहारेदार म्हणून १० वर्षांपासून काम करत होते.

दिनांक २ फेब्रुवारीच्या पहाटे बी-बियाणे अंतर्गत ‘ड’ विभागात ३ नंबर शेडवर रात्रपाळीसाठी कामावर हजर होते. पहाटे ते मृतावस्थेत आढळून आले. या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात आण्यात आला होता.

यावेळी त्यांचा भाऊ मनोज पवार यांनी विद्यापीठ प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. सतत १० वर्ष रात्रपाळी ड्युटीमुळे भाऊ चंद्रकांत वैफलग्रस्त जीवन जगत होते. ते खूप निराश राहात होते.

यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी विद्यापीठाचे अधिकारी आपल्या मर्जीतील लोकांना त्यांच्या सोयीनुसार ड्युटी देतात व सामान्य कामगारांची कायम पिळवणूक करतात, असा आरोप केला. पवार यांच्या पश्चात मुलगा आणि वयोवृद्ध आई, वडील आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe