चिचोंडी पाटील : पाचपुते व माझे काही गैरसमज होते, पण आम्ही आता एकत्र आलो आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पाचपुते व विजय औटी यांचेच काम करावे अन्यथा माझ्या घराचे दरवाज़े कार्यकर्त्यांना कायमचे बंद होतील, अशी तंबी आमदार शिवाज़ीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.
बुऱ्हाणनगर येथे नगर , पारनेर व श्रीगोंदा, नगर मतदारसंघात येणाऱ्या नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार सुजय विखे, बबनराव पाचपुते, विजय औटी उपस्थित होते.
या वेळी सुजय विखे म्हणाले की, नगर तालुक्यावर श्रीगोंदा व पारनेरचा निकाल अवलंबून आहे. काही ठिकाणी अफवांचे पीक आले आह, त्याकडे दुर्लक्ष करा.
राहुरीची चिंता करू नका, राहुरीत मी व कर्डिले एकत्र असल्याने कोणाचीही डाळ शिजणे शक्य नाही. या वेळी पाचपुते यांनी, झाले गेले सगळे विसरून जा, माझे काही चुकले असेल तर मला माफ करण्याची विनंती केली. या वेळी औटी यांनी, काही कार्यकर्ते प्रचारात दिसत नसल्याची खंत व्यक्त करून ते कुणासाठी थांबले आहेत, असा प्रश्न उपस्थित केला.
या वेळी सर्वश्री: हरिभाऊ कर्डिले, रवींद्र कडूस, विलास शिंदे, अभिलाष घीगे, रेवणनाथ चोभे, संतोष म्हस्के, रावसाहेब साठे, शरद दळवी, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले, शिवाजी कार्ले आदी उपस्थित होते.
- २ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..
- ‘या’ देशात मिळते चक्क दुबईपेक्षाही स्वस्त सोने !
- स्मार्टफोन बाजारात भारताचा दबदबा ; विक्रमी निर्यातीचा अंदाज