नगर : संग्राम जगताप हे केवळ नगर शहराचे उमेदवारच नाहीत, तर या उमेदवाराच्या मागे शरद पवार यांचे विचार आहेत. संग्राम जगताप हा शहर विकासाला पुढे घेऊन जाणारा चेहरा आहे. तरुणांना रोजगार मिळावा, शहराचे प्रश्न सुटावेत, यासाठी जगताप यांनी प्रयत्न केले, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी केले.
नगर शहर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या माळीवाडा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. नगरकरांनी मला संधी दिली.

नगरकरांनी दिलेल्या या संधीमुळेच पाच वर्षांत शहरातील उपनगरांमध्ये चांगल्या पध्दतीचे काम करू शकलो. नगर शहर उपनगरात अनेक विकासकामातून एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
त्याच माध्यमातून तरुण पिढीला आयटी पार्कच्या माध्यमातून पाच वर्षांत ४०० ते ५५० तरुणांना नोकरी देण्याचे काम केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. या वेळी प्रा. अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक अविनाश घुले, निखिल वारे, उबेद शेख, राधेश्याम शर्मा आदींची भाषणे झाली.
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही