अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- दोन दिवसांच्या जोरदार घसरणीनंतर आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वाढलेल्या दिसून आल्या.
एमसीएक्सवर सोन्याची किंमत ०.२% पर्यंत वाढली. यासह सोन्याची ताजी किंमत प्रति १० ग्रॅम ४७,९४७ रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर चांदीचा दरही १.५ टक्क्यांनी वाढून ६८,५७७ रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारपेठेत झालेल्या बदलांमुळे चांदीच्या किंमती मागील दिवसात जवळपास ६००० रुपयांनी घसरल्या. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ४७,७०२ रुपयांवर बंद झाले होते.
अमेरिकन डॉलरच्या बळकटीमुळे जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती ०.४% वाढून १,८४४.४८ डॉलर प्रति औंस झाल्या. मागील सत्रात ८% कमी झाल्याने चांदीचा वायदा आज ३.२% वाढून २७.२५ डॉलर प्रति औंस झाला.
दोन दिवसांत कमालीची घट दिल्ली बुलियन मार्केटमध्ये मंगळवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 480 रुपयांची घसरण झाली. त्याच वेळी चांदीच्या किंमतीत प्रचंड घट नोंदली गेली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved