माजी आमदार वैभव पिचड यांची झाली ‘ह्या’ पदावर निवड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीयमंत्रीपदी अकोलेचे माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांना प्रथमच राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

या निवडीचे पत्र अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष समीर उरांव यांनी दिले. राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचे आदिवासी समाजासाठी असलेल्या

योगदानाचा व अनुभवाचा फायदा या निमित्ताने होणार असल्याचे मत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले. तसेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने घेतलेली

दखल ही निश्चितच आदिवासी समाजासाठी अजून काम करण्यास प्रेरणादायी ठरणार आहे.या संधीचा उपयोग देश पातळीवर काम करताना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News