अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर सरकार आता सर्व सुरु करण्याची परवानगी देत आहे परंतु अजूनही वाडिया पार्क येथील जलतरण तलाव बंद आहे.
तरी तो सुरु करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान फुलसौंदर यानी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळासह व नागरिकांसह दिले आहे.
यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक शाम नळकांडे, अमोल येवले, मनीष गुगळे, बजरंग भुतारे, विजयकुमार बोरुडे, विकास गिरी, अतुल मुनोत, रसिक कटारिया, शिवलिंग डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना फुलसौंदर म्हणाले की, आता एस.टी. बस, सिनेमागृह आदी विविध पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत.
तर मग जलतरण तलाव का नाही सुरु होत असा सवाल उपस्थित करत सध्या कोविडपासून बंद असलेला या जलतरण तलावाचे अनेक वार्षिक सभासद आहेत.
त्यामध्ये अनेकजण विविध आजाराने ग्रस्त आहेत. अशा वेळी तलाव बंद असल्याने त्यांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. तरी हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved