जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकजण अटकेत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-जामखेड शहरातील तपनेश्वर रोड वरील मटका बुकी करणाऱ्या तसेच बाजारतळ व भुतवडारोड येथील पानटपऱ्यावर मवा बनवुन विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून गुन्हे दाखल केले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जामखेड शहरात मावा विक्री करत आसल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील तपनेश्वर रोड वर असलेल्या एका हॉटेल जवळ मटका बुकी करणाऱ्या आरोपी रज्जाक बशिर पठाण रा. जामखेड

याला पोलिसांनी मटक्याचे साहित्य व रोख रक्कम असा एकुण १३८० रुपये जप्त केले. पो. कॉ. प्रकाश गणपत वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment