कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासाठी सीईओना निवेदन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- करोनाच्या संकटकाळात सेवा देऊनही भिंगार छावणी परिषदेतील सफाई कर्मचार्‍यांचे वेतन थकले असताना त्यांचे वेतन तात्काळ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हंटले आहे कि, भिंगार छावणी परिषदेत सफाई कर्मचार्‍यांनी करोनाच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे सेवा केली.

यापैकी अनेक कर्मचार्‍यांना करोना योध्दा पुरस्कार देखील मिळाला आहे. मात्र, करोना योध्दे असलेल्या या सफाई कर्मचार्‍यांचे दोन ते तीन महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे.

वेतन नसल्याने सफाई कर्मचार्‍यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठिण झाले असून, त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या कर्मचार्‍यांचे थकित वेतन तात्काळ मिळावे व त्यांचे वेतन महिन्याला वेळेत मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे शहर अध्यक्ष शहानवाज शेख, भिंगार शहर अध्यक्ष अजय सोळंकी,

नवीन चौहान, निलेश चौधरी, गणेश भोसले, बाळासाहेब थोरे, कैलाश मोरे, सुरेश अंधारे, सनी भोसले, दीपक सुरेरा आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News