नगर : महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करून आयपीआय युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार आम्ही करणार आहेत. पक्षातील काही नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल. असे सुनिल साळवे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

परंतु निवडणूक कोणी लढवायची तो निर्णय पक्षाचे अध्यक्ष आठवले हे घेतात. त्यामुळे आम्ही नगर जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी विनोद भांबळ, भाऊसाहेब साळवे, जितू ठोंबे, शिवाजी साळवे, सचिन साळवे, गायकवाड आदी उपस्थित होते.
- किया सेल्टोससोबत ‘K.I.D.’ उपक्रमाचे पुनर्लाँच; सुरक्षित व जबाबदार ड्रायव्हिंगसाठी नवे डिजिटल पाऊल
- फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन बाजारासाठी ‘हॉट’ महिना; फ्लॅगशिपपासून प्रीमियम मिड-रेंजपर्यंत अनेक मोठे लॉन्च
- अर्थसंकल्पाच्या आधीच सोन्या-चांदीला मोठा धक्का; वायदा बाजारात लोअर सर्किट, सामान्य ग्राहकांना दिलासा
- शेअर बाजारात विशेष व्यापार सत्र, गुंतवणूकदारांचे लक्ष ठरलेल्या टॉप स्टॉक्सकडे
- आयफोन 16 आजही लोकप्रिय; जगात आणि भारतात सर्वाधिक विक्रीचा दावा












