राज्यमंत्री तनपुरेंच्या प्रयत्नांना यश; विजेचा लपंडाव होणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे नियोजनाच्या अभावामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. वारंवार खंडीत होणारा तसेच कमी दाबाने मिळणा‍ऱ्या विजेमुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे.

हि समस्या सुरू करण्यासाठी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशाने दिनदयाल उपाध्याय ज्योती ग्रामीण योजने अंतर्गत तीन रोहीत्र मंजूर झाले आहे.

टाकळीभान-बेलपिंपळगांव रस्त्यालगत वास्तव्यास असणा‍ऱ्या थोरात-बोडखे-वेताळ वस्ती वरील नागरीकांना सिंगल फेज विजपुरवठा उपलब्ध व्हावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

त्यास अनुसरून महावितरणचे प्रल्हाद टाक यांनी सिंगल फेज संदर्भात आराखडा तयार करून कार्यवाही करण्याच्या सूचना कर्मचा‍ऱ्यांना दिल्या आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी योजने अंतर्गत थकीत विजबिला पैकी पन्नास टक्के रक्कम शेतक‍ऱ्यांनी टप्प्याटप्प्याने भरल्यास उर्वरीत पन्नास टक्के रक्कम शेतक‍ऱ्यांचे माफ होणार असल्याचे टाक यांनी यावेळी सांगीतले.

संबधित गावातून विजबीलापोटी जमा झालेली रक्कम इतरत्र न वापरता त्याच गावाच्या विजकामासाठी वापरली जाणार आहे. तरी सर्वच शेतक‍ऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून महावितरणास सहकार्य करावे, असे आवाहन उपअभियांता टाक यांनी केले आहे.