राजकारण कसे केले पाहिजे हे पाहण्यासाठी आपल्याला बाळासाहेब थोरात यांचा आदर्श घेतला पाहिजे !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-राजकारणात आपली ताकद असेल तर किंमत असते, आपली ताकद दिसली तर आपल्याला मित्र पक्ष देखील विचारात घेतील. म्हणून आपल्याला जबाबदारीने काम करावे लागणार आहे.

राजकारनात नेता कसा असला पाहिजे व राजकारण कसे केले पाहिजे हे पाहण्यासाठी आपल्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आदर्श घेतला पाहिजे,

आगामी निवडणुकीत पक्षाची सत्ता कशी येईल का यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत असे आवाहन आ. डॉ सुधीर तांबे यांनी केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसा निमित्त कर्जतमध्ये आयोजित काँग्रेस बळकटीकरण सप्ताहानिमित्त काँग्रेस शहर कार्यकर्त्याच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी बोलताना काँग्रेस ही सर्वसामान्यांचा विचार केला करणारी आहे. आजचे केंद्रातील शासनकर्ते मोकळेपणाने बोलू देत नाही, येन केन मार्गाने सत्ता मिळविन्यासाठी प्रयत्न करत आहेत,

देशाचे पंतप्रधान पंतप्रधान हे सर्व पालक असतात मात्र मोदी यांना अहंकार झाला आहे. आज आपण परदेशात निंदा होत आहे, अशा देशात लोकशाहीला बाधा येईल असे काम केले जात आहे.

देशातील चांगल्या कंपन्या अंबानी, अदानी ना विकण्याचे काम करायचे असून. या विरुद्ध काँग्रेसला लढावे लागेल. सध्या धर्माचे राजकारण केले जात असून काँग्रेसला बदनाम करण्याचे काम केले जात आहे.

आगामी काळात आपल्याला पक्षाचे सूक्ष्म काम करावे लागणार आहे, ना थोरात यांच्या सारखे काम आपल्याला करायचे असल्याचे आवाहन डॉ तांबे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News