श्रीगोंदा : बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे हे दोन्ही तालुक्यातील नेते एकत्र आल्याने गटातटाचे राजकारण संपुष्टात आले आहे. आता खरे तालुक्याचे विकासपर्व सुरु होणार आहे. त्याचबरोबर श्रीगोंदा तालुक्याच्या पाणी प्रश्नात नागवडे -पाचपुते एकत्र आल्यामुळे घोड कुकडीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. असे मत नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी व्यक्त केले.
बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ शहरातून फेरी काढली होती. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या श्रीगोंदा शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी पाचपुते यांच्या पाठीशी उभे रहा. श्रीगोंदा शहराचा सर्वांगिण विकास व शहरातील विविध विकासकामासाठी पाचपुते आमदार नसतानाही कोट्यवधी रुपयांचा निधी आणला .

मागील काही गैरसमजुतीतून पाचपुते यांच्यापासून दूर राहावे लागले.पण आता पुन्हा शहराच्या विकासाच्या मुद्यावर आम्ही राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली पाचपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
- श्रीरामपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?, कोणत्या राज्यात किती जिल्हे?, पाहा आकडेवारी
- पुणे – नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा डीपीआर पूर्ण ! संगमनेरमार्गे की शिर्डीमार्गे कशी जाणार नवीन रेल्वे लाईन?
- जगातील काही देशांपेक्षाही मोठं आहे भारतातील ‘हे’ शहर! एका टोकापासून दुसऱ्या टोकावर जायला लागतो तासांहून अधिक वेळ
- Post Office च्या आरडी योजनेत 10,000 रुपयाची गुंतवणूक केल्यास 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार?