पवार ८० वर्षांचे तरीही तरूणासारखा प्रचार

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर – राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाला चांगले वातावरण आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज्यात आघाडीच्या १५० पेक्षा जास्त जागा निवडून येणार असून आघाडीची सत्ता स्थापन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.   

संगमनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी आ. थोरात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शहराध्यक्ष प्रशांत वामन, सरुनाथ उंबरकर, नगरसेवक किशोर पवार, निखील पापडेजा, शरीफ शेख, हाफिज शेख, किरण घोटेकर, अक्षय भालेराव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलतांना आ. थोरात म्हणाले की, पाच वर्षापुर्वी ईडी काय आहे हे कोणालाच माहित नव्हते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ८० वर्षे वय असतांना देखील ते एखाद्या तरुणासारखे प्रचार करण्यासाठी राज्यात फिरत आहेत. त्यांना लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत असल्याने भाजप सरकार घाबरले आहे. त्यामुळे पवार यांच्यावर ईडीने नोटीस काढली होती.

मात्र ते त्यालाही घाबरले नाही, आणि इंडी कार्यालयात स्वत जाण्याचा निर्णय पवार यांनी घेतला. तसेच राज्यातूनही इंडीवर राज्य सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष बघायला मिळाला. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने राज्यासह विदर्भातही चांगलेवातावरण आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील या संस्था आहेत.

त्या संस्थांमध्ये यापुढे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येणार असून या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान घडवून आणा, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी आबासाहेब थोरात म्हणाले कि, आ. बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शिक्षण व दुध व्यवसायातून समृद्ध झालेला संगमनेर तालुका राज्यात विकासातून पुढे नेला आहे.

पुरोगामी विचारांचे सर्व मित्रपक्ष व जनता यांचा त्यांना पाठींबा असून विरोध करण्यासारखा एक ही मुद्दा तालुक्यातील विरोधकांकडे नाही. या तालुक्यात विरोधकांचे एक विधायक काम नाही. त्यामुळे सर्वांनी आपल्यातील मतभेद विसरुन आ. थोरात यांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रशांत वामन, कपिल पवार यांची भाषणे झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment