नेवासे –
माजी आमदार शंकरराव गडाखांचा बालेकिल्ला असलेल्या सोनईत भाजपचे उमेदवार आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सोमवारी काढलेल्या प्रचार रॅली काढली. यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा सहभागी झाले होते.
मागील निवडणुकीत सोनईत मुरकुटे यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आले होते. त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. पाच वर्षांनी भाजपने शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. दोन महिन्यांपूर्वी सोनईमध्ये पाणीटंचाई असताना देसरडा यांनी स्वखर्चाने टँकर चालू केले होते.
गडाख यांनी ताकद वापरून घोडेगाव ग्रामपंचायत मिळवण्याचा केलेला प्रयत्न देसरडा यांनी मोडीत काढला होता. त्यामुळे घोडेगाव, सोनईत त्यांचे राजकीय वजन मोठे मानले जाते. या प्रचार रॅलीमध्ये प्रकाश शेटे, वैभव शेटे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.