श्रीरामपूर :- भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल, त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या असे आवाहन मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी प्रचारादरम्यान केले.
मतदार संघातील चांदेगाव, ब्राह्मणगाव भांड, करंजगाव, बोधेगाव, जातप, त्रिंबकपूर, लाख, मुसळवाडी, बेलापूर खु., पढेगाव, निपाणीवडगाव येथील प्रचारसभांमध्ये मुरकुटे बोलत होते, सण १९९९ ते २००९ या दहा वर्षात तालुका भकास झाला, हक्काचे पाणी गेले, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
आज अशोक उद्योग समूह एवढे एकच विकासाचे व अर्थकारणाचे केंद्र उरले आहे. पाटपाण्याअभावी अशोक व राहुरी असे दोन्ही साखर कारखाने अडचणीत सापडले या कामधेनू वाचवायच्या असतील तर महायुतीच्या च्या उमेदवारास विजयी करा असे ते यावेळी म्हटले.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार