श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी बाजी मारली असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने लहू कानडे यांना उमेदवारी दिल्याने तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना कांबळे यांचे काम करण्याचा आदेश दिल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमध्ये चैतन्य निर्माण झाले असून स्थानिक उमेदवार म्हणून भाऊसाहेब कांबळे यांचे पारडे जड मानले जात आहे.
दुसरीकडे करण ससाणे यांच्या गटाची धरावे की सोडावे अशी अवस्था झाल्याने ससाणे गटाची यंत्रणा कुणाला मदत करणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या आठवड्यात ससाणे गट व भाऊसाहेब कांबळे यांच्या विरोधातील लोकांनी राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क साधून अपक्ष उमेदवार उभा करण्याची योजना आखली होती. तशी तयारीही पूर्ण झाली होती.
याबाबत आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनाप्रमुखांचे लक्ष वेधून नामदार विखे यांना पक्षाचे काम करण्याबाबत समज द्यावी असे सांगितल्याची चर्चा असून त्यानुसार उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे यांच्याशी चर्चा करून युती धर्म पाळण्याची सूचना केली होती. त्यानंतर लगेच विखे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संपर्क करुन भाऊसाहेब कांबळे यांचे काम करण्याचा आदेश दिला.
- Share Market गुंतवणूकदारांची चांदी होणार ! एका शेअरवर थेट 40 रुपयांचा डिव्हीडंड देणार ‘ही’ कंपनी
- शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांना हे 3 स्टॉक बनवणार मालामाल ! मिळणार 53 टक्क्यांपर्यंत रिटर्न
- नोकरीचं टेन्शनचं राहणार नाही ! पोस्टाच्या ‘या’ योजनेतून दरमहा 61,000 रुपयांची कमाई होणार ! कशी आहे योजना ?
- ब्रेकिंग ! शिर्डीसह राज्यातील ‘या’ 17 नगरपालिकांवर आता SC कॅटेगिरीमधील महिला होणार नगराध्यक्ष, वाचा डिटेल्स
- Share Market मधील गुंतवणूकदारांना कमाईची सुवर्णसंधी ! ‘या’ महिन्यात 3 कंपन्या देणार Dividend