कुकडीचे पाणी अडवणाऱ्यांना धडा शिकवा : ना.शिंदे

Ahmednagarlive24
Published:

जामखेड : कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे कुकडीचे पाणी बारामतीकरांनी पुणे जिल्ह्यात अडविले होते. परंतु मी कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी आणले. आज त्या खुनसीपोटी निवडणुकीत उभे राहिले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुकडीचे हक्काचे पाणी पुणे जिल्हात ठेवण्यासाठीच त्यांना आमदार व्हायचे आहे.

परंतु ही जनतेने आपला स्वाभीमान दाखवत बारामतीचं पार्सल परत पाठवण्याची व तुमच्या हक्काचे पाणी अडविणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.अशी टीका ना.राम शिंदे यांनी राष्ट्रवादीवर केली.

जामखेडमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळीते म्हणाले की, कर्जत जामखेडची खूप हुशार आहे, तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांना जामखेड तालुक्यातील शेतकऱ्­यांनी पाण्याच्या मागणीचे दिलेले निवेदन फेकून दिले होते. आता तेच याच शेतकऱ्यांकडे मते मागत आहेत.मुळात त्यांची सत्ताच येणार नाही आणि ते कुठून कुकडीचे पाणी देणार आणि कसा तालुक्याचा विकास करणार.ते फक्त तालुक्यातील गरीब जनतेची दिशाभूल करून चेष्टा करत आहेत.

आता आपल्या भागांचा विकास होऊ लागला तो त्यांना पहावत नाही. कारण आपल्या शेतीला कायमस्वरूपी कुकडीचे पाणी आले तर बारामतीकरांचा ऊस कोण तोडणार. त्यामुळे ते जामखेड व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हक्काचे पाणी येऊ देणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment