विकासकामांचा जनतेला हिशेब द्या : आमदार कर्डिले

Ahmednagarlive24
Published:

राहुरी: तालुक्याची वाट लावल्याने जनतेने तुम्हाला घरी बसवले. तुमच्या २५ वर्षांच्या सत्तेतील कर्तबगारी व माझ्या १० वर्षांतील विकासाची कामगिरी समोरासमोर ठेवून जनतेला हिशेब द्या, असे आव्हान आमदार शिवाजी कर्डिले यांनी तनपुरे यांना दिले.

उंबरे येथील सभेत कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी नामदेव ढोकणे होते. राहुरीची अस्मिता जिवंत ठेवा, असे भावनिक आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत स्वत:चे घर सोडून दुसरा उमेदवार चालू शकत नाही का, असा सवाल करत गळ्यापर्यंत आल्यावर अस्मिता आठवली. जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा, असे सुभाष पाटील यांनी म्हणाले.

वसंतदादा पाटलांचे शिक्षण चौथीपर्यंत होते. ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले नव्हते. मात्र, त्यांना शेती, शेतकरी, कारखानदारी समजली होती. आपल्याकडे वडिलांनी वांबोरीत काढलेला कारखाना मुलगा चालवतो. तुमचे स्वत:चे कर्तृत्व काय, असा सवालही पाटील यांनी केला.बाळासाहेब गाडे, शिवाजी सागर, ज्ञानदेव क्षीरसागर यांचीही भाषणे झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment